-
सलमान खानचा आज ५८ वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने खान कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळ एकत्र आले होते. सलमान खानने त्याच्या भाचीसोबत केक कापला. सलमानच्या पार्टीला युलिया वंतूरही उपस्थित होती. तसंच, त्याच्या कुटुंबातील अलविरा खान अग्निहोत्री, अरबाज खान, अरहान खान आणि हेलन उपस्थित होते. बॉबी देओल, नेहा धुपिया आणि रितेश आणि जेनेलिया देशमुखही तिथे दिसले.
-
बॉबी देओल आणि सलमानमधील बॉन्डिंग यावेळी दिसली.
(फोटो: बॉबी देओल/इन्स्टाग्राम) -
“मामू मी तुझ्यावर प्रेम करतो ❤️,” त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं.
(फोटो: बॉबी देओल/इन्स्टाग्राम) -
नेहा धुपियाने सलमानच्या बर्थडे पार्टीचे काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत.
(फोटो: नेहा धुपिया/इन्स्टाग्राम) -
नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांनी पार्टीत सेल्फी काढल्या.
(फोटो: नेहा धुपिया/इन्स्टाग्राम) -
पार्टीत नेहा धुपियासोबत सुनील ग्रोव्हर.
(फोटो: सुनील ग्रोवर/इन्स्टाग्राम) -
“शानदार सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा ?,” नेहाने लिहिले.
(फोटो: नेहा धुपिया/इन्स्टाग्राम) -
पार्टीच्या रात्री रितेश आणि जेनेलिया देशमुख देखील सहभागी झाले होते. “भाऊ… तो माणूस ज्यावर मी बिनशर्त प्रेम करतो. @beingsalmankhan. तुझं जीवन प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेले राहो. आज आणि प्रत्येक दुसर्या दिवशी तुझ्या वाढदिवशी मी तुला फक्त शुभेच्छा देतो…. #happybirthdaysalmankhan”, असं रितेशने शेअर केले. (फोटो: रितेश देशमुख/इन्स्टाग्राम)
-
अॅनिमल स्टार बॉबीनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान आणि फिल्म प्रोड्यूसर कामयानी पुनिया आहेत.
(फोटो: बॉबी देओल/इन्स्टाग्राम)

“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”