-
‘अप्सरा आली’ या रिअॅलिटी शोमधून अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली.
-
अभिनेत्रीचा संघर्ष भारावून टाकणारा आहे. कोणाचंही पाठबळ नसताना आज मराठी कलाविश्वात तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
बालपणी माधुरी तिच्या आजीबरोबर झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात राहायची.
-
अशा संघर्षमय परिस्थितीवर मात करत अभिनेत्रीने तिचं शिक्षण पूर्ण केलं व नृत्याची आवड जपली.
-
माधुरी पवार मूळची साताऱ्याची आहे.
-
आजवर अभिनेत्री साताऱ्यात भाड्याच्या घरात राहत होती. परंतु, माधुरीने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
अभिनेत्रीने या नववर्षाच्या सुरुवातीला तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
गृहप्रवेश व नवीन घराची खास झलक माधुरीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
अभिनेत्रीच्या नव्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
-
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने “नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो | मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा |” हा श्लोक लिहिला आहे.
-
माधुरीने पारंपरिक पद्धतीने पूजा करून नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
या गृहप्रवेश समारंभाला तिचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
-
नव्या घराच्या निमित्ताने माधुरीची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे.
-
अभिनेत्रीने नव्या घराच्या दारावर ‘वेलकम टू द पवार फॅमिली’ अशी साधी व सुंदर पाटी लावली आहे. ही नेमप्लेट सर्वाचं लक्ष वेधून घेते.
-
दरम्यान, माधुरी पवारने शेअर केलेल्या या नव्या घराच्या फोटो व व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : माधुरी पवार इन्स्टाग्राम )

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल