-
रिसेप्शनचया या डोळे दिपवणाऱ्या सोहळ्यात इरा खान, आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी, तिचे पती नुपूर शिखरे यांच्यासह, मुंबईत एका भव्य लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक सिनेताऱ्यांनी हजेरी लावली होती. या भव्य कार्यक्रमात शाहरुख खान, रणबीर कपूर, कतरिना कैफ, सलमान खान आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह बॉलिवूडच्या ए-लिस्टर्सची उपस्थिती होती. स्टार-स्टडेड पार्टीमध्ये कोणी काय परिधान केले हे पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. (स्रोत: वरिंदर चावला)
-
नववधू, इराने या सोहळ्याची शोभा वाढवणारा अतिशय सुंदर, सिंदूरी लाल रंगाचा भारी-भरतकाम केलेला लेहेंगा, परिधान केला होता. तर, काळ्या रंगाची शेरवानी जॅकेट आणि धोती सेट नुपूरने घातल्याने दोघांची जोडी उठून दिसत होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
आमिर खानने, जुनैद आणि आझाद या त्याच्या दोन्ही मुलांसोबत पांढरा पायजमा आणि क्लासिक काळ्या बंद गळ्याच्या पोषाखात पोज दिली आहे. (स्रोत: वरिंदर चावला)
-
शाहरुख खानने मॅचिंग ब्लेझर आणि ट्राउझर्ससह काळ्या वेस्टकोटमध्ये जबरदस्त लुक केला आहे. त्याची पत्नी, गौरी खानने सोनेरी नक्षी असलेला मरून सूट घातलेला होता. (स्रोत: व्हायरल भयानी/इन्स्टाग्राम)
-
कंगना रणौतने फुलांचे नक्षीकाम केलेल्या आणि अतिशय सुंदर गुलाबी, राखाडी रंगाच्या लेहेंग्यासह सोहळ्यात हजेरी लावली. गुलाबी ओढणी, मोती आणि हिर्याचे दागिने आणि कपाळावरील नाजूक टिकलीने संपूर्ण पेहेराव अतिशय खुलला होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
तापसी पन्नूने संपूर्ण पांढऱ्या रंगामध्ये असणाऱ्या, क्रॉप एथनिक जॅकेटचा शरारा सेटची आकर्षक निवड केली. हातात मॅचिंग क्लच घेऊन हा लूक पूर्ण केला होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
सलमान खानने संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख केला होता. यामध्ये काळ्या रंगाचे ब्लेझर, शर्ट, पँट आणि चमकदार बूट यांचा समावेश होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
शर्वरी वाघने न्युड मेकअप आणि मोजक्या दागिन्यांसह गडद-पिवळा लेहेंगा परिधान केल्याचे या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. (स्रोत: वरिंदर चावला)
-
मृणाल ठाकूर आणि मानुषी छिल्लर या दोघींनी लग्नाच्या रिसेप्शनसाठी काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. या साड्यांमध्ये त्या दोघी अत्यंत सुंदर दिसत होत्या. (स्रोत: वरिंदर चावला)
-
कतरिना कैफने रिसेप्शनसाठी आकर्षक बेज रंगाचा क्लासिक सब्यसाची लेहेंग्याची निवड केली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
रणबीर कपूर पारंपारिक क्रीम-रंगाचा कुर्ता-पायजामा सेट परिधान केला असून, त्यावर जाकीट घातलेले आहे. (स्रोत: वरिंदर चावला)
-
भूमी पेडणेकरने मेटॅलिक-टोन्ड लेहेंग्यासोबत मॅचिंग प्रिंटेड ओढणी आणि कॉर्सेट-स्टाईल ब्लाउज घातलेला होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
सोभिता धुलिपालाने बारीक नक्षी असलेल्या सोनेरी रंगाची अत्यंत सुंदर अशी साडी नेसलेली या फोटोमध्ये पाहू शकतो. (स्रोत: वरिंदर चावला)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा