-
अभिनेत्री श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
आजवर श्रुतीने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.
-
‘झी मराठी’वरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे श्रुती घराघरांत लोकप्रिय झाली.
-
अभिनेत्रीने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
-
यावेळी श्रुतीने मराठी इंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाबाबत सांगितलं.
-
श्रुती मराठे सांगते, “काही वर्षांपूर्वी मराठी इंडस्ट्रीत मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. तेव्हा या क्षेत्रात काम करून मला बरीच वर्षे झाली होती. मी अगदीच नवखी नव्हते. आपल्या इंडस्ट्रीत बऱ्याच जणांचा अभिनेत्री कायम उपलब्ध असतात असा गैरसमज आहे.”
-
“अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं. हे कोणी पसरवलं? या गोष्टी कुठून सुरु झाल्या?” असा सवाल श्रुतीने यावेळी उपस्थित केला.
-
श्रुतीला एका चित्रपटासाठी फायनान्सर भेटायला आले होते.
-
याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “त्या फायनान्सरने मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे? असं विचारलं. मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास, तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते नक्की देईन. आम्ही दोघंच तेव्हा चर्चा करत होतो आणि ती व्यक्ती मला तोंडावर असं बोलली होती…ते ऐकून दोन ते तीन मिनिटांसाठी मी ब्लँक झाले होते.”
-
श्रुतीला ती परिस्थिती नेमकी कशी हाताळायची याची काहीच कल्पना नव्हती.
-
यापूर्वी कधीही असा अनुभव आला नसल्याने श्रुतीला प्रचंड घाम फुटला होता.
-
परंतु, अभिनेत्रीला वेळीच त्या माणसाला काहीतरी उलटं उत्तर दिलं पाहिजे याची जाणीव झाली.
-
श्रुतीने त्या फायनान्सरला त्याच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं.
-
अभिनेत्री त्या फायनान्सरला थेट म्हणाली, “अच्छा…म्हणजे मी तुमच्याबरोबर झोपले, तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का?” तेव्हा तो माणूस समोरुन विचारतो ‘हे काय बोलतेस तू?’ नंतर मी त्यांना म्हणाले, माझ्याबद्दल ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला? यापुढे कोणाशीही बोलताना थोडा तरी अभ्यास करून या.”
-
असा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव श्रुतीने मराठेने सांगितला. ( सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे इन्स्टाग्राम )

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”