-
‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाने अभिनयाबरोबरचं आपल्या नृत्य कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
लवकरच पूजा लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
१६ फेब्रुवारीला पूजाचा सिद्धेश चव्हाणबरोबर साखरपुडा झाला. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पारंपरिक पद्धतीने पूजाचा साखरपुडा पार पडला. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाने काल साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत; जे चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजा आता कधी लग्नबंधनात अडकणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाचा होणारा नवरा अभिनेता नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. अभिनेत्रीचं हे अॅरेंज मॅरेज आहे. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
सिद्धेश हा ऑस्ट्रेलियात राहत असल्यामुळे लग्नानंतर पूजा सावंतही ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
या प्रश्नाचं उत्तर पूजा सावंतने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये दिलं होतं. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजा म्हणाली होती, “तो कायमस्वरुपी ऑस्ट्रेलियात नाहीये. तो आताच दोन वर्षांपूर्वी गेलाय. तो मूळचा मुंबईचा आहे. त्याचे आई-बाबा मुंबईत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मुंबईतचं राहणार आहोत.” (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
“काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन,” असं पूजा म्हणाली. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पुढे अभिनेत्री म्हणाली की, हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत. त्यामुळे आमचं असं आहे, ठीक आहेना, चल बघू या. आपण करू. आपल्याला जमेल. म्हणून आम्ही फार विचार करणार नाही. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
तसंच पूजाने लग्न मुंबईतचं होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर