-
‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे मनोरंजनसृष्टीत फारशी दिसत नसली तरी ती राजकारणात सक्रिय आहे. (फोटो सौजन्य – मेघा धाडे इन्स्टाग्राम)
-
महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष पदावर मेघा धाडे आहे. (फोटो सौजन्य – मेघा धाडे इन्स्टाग्राम)
-
राजकारणानंतर मेघाने व्यवसायात पदार्पण केलं आहे. रत्नागिरीच्या समुद्र किनारी व्हिला सुरू केला आहे. (फोटो सौजन्य – मेघा धाडे इन्स्टाग्राम)
-
१७ फेब्रुवारीला मेघाची मैत्रीण सई लोकूरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये मेघाने नवा व्यवसाय सुरू केल्याचा खुलासा केला. (फोटो सौजन्य – मेघा धाडे इन्स्टाग्राम)
-
रत्नागिरीतील गणेशगुळे येथील समुद्र किनारी मेघाने सुंदर व्हिला सुरू केला असून तो पर्यटकांसाठी खुला झाला आहे. (फोटो सौजन्य – मेघा धाडे इन्स्टाग्राम)
-
‘व्हिला मँगोस अँड सीशेल्स’ (Villa Mangoes And Seashells) असं मेघाच्या नव्या व्हिलाचं नाव आहे. (फोटो सौजन्य – व्हिला मँगोस अँड सीशेल्स इन्स्टाग्राम)
-
मेघाचा हा व्हिला आलिशान आहे. या व्हिलाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – मेघा धाडे इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रीचा सुंदर व्हिला पाहून जुनं ते सोनं ही म्हण आठवते. कारण या व्हिलामध्ये पितळेची भांडी, लाकडी उखळ असं बरंच काही आहे. (फोटो सौजन्य – व्हिला मँगोस अँड सीशेल्स इन्स्टाग्राम)
-
तसेच या आलिशान व्हिलामध्ये लाकडाचं सामान अधिक प्रमाणात आहे. (फोटो सौजन्य – व्हिला मँगोस अँड सीशेल्स इन्स्टाग्राम)
-
सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत या सध्या मेघाच्या या नव्या व्हिलामध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. यासंबंधित अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर अभिनेत्रींनी शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – व्हिला मँगोस अँड सीशेल्स इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही दिवसांपूर्वी या व्हिलाचे काम सुरू होते. त्यामुळे मेघा याकामात व्यग्र होती, असं तिने एका व्हिडीओवर चाहतीला सांगितलं. (फोटो सौजन्य – व्हिला मँगोस अँड सीशेल्स इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, प्राजक्ता माळीनंतर मेघाच्या या आलिशान व्हिलाची चर्चा रंगली आहे. (फोटो सौजन्य – व्हिला मँगोस अँड सीशेल्स इन्स्टाग्राम)

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आणि पाकिस्तानला गोंजारलं; तेल आयातीसंदर्भात करार!