-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासह लग्नबंधनात अडकली आहे.
-
अवघ्या दोन ते तीन दिवसात तिने लग्नाच्या महत्त्वाच्या विधी आटोपल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच तिने साखरपुड्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती आणि त्या मागोमाग लगेचच हळदी आणि लग्नाच्या पोस्ट पाहून चाहते थक्क झाले आहेत.
-
तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती.
-
यानंतर तिने युट्यूबवर प्रपोजल व्हिडीओ देखील शेअर केला होता. त्यामुळे तितीक्षा व सिद्धार्थ या दोघांचेही चाहते त्यांचा साखरपुडा व लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
-
सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे.
-
२५ फेब्रुवारीला त्यांनी गुपचुप साखरपुडा उरकत चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला.
-
तितीक्षा-सिद्धार्थचा साखरपुडा जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला.
-
यावेळी तितीक्षाने लॅव्हेंडर रंगाची साडी तर, सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
साखरपुड्याच्या या फोटोला त्यांनी ‘Forever with my best friend’ असं कॅप्शन दिलं होतं.
-
या धक्क्यातून सावरत नाही तोच हळदीचा व्हिडीओ पाहून चाहते आणखीनच खुश झाले.
-
गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर तितीक्षा व सिद्धार्थने लगेचच हळदीचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले.
-
हळदी समारंभाला तितीक्षाने पांढऱ्या रंगाची साडी नेसून त्यावर फुलांचे आकर्षक दागिने परिधान केले होते.
-
तर सिद्धार्थने खास पांढऱ्या रंगाचा सदरा घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला.
-
या व्हिडीओमध्ये “चला उष्टी हळद लागलेली आहे…” असं म्हणत सिद्धार्थने तितीक्षाला मिठी मारल्याचं पाहायला मिळालं.
-
साखरपुडा व हळदी समारंभ पार पडल्यानंतर काही वेळातच तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाचा सुंदर व्हिडीओही समोर आला आहे.
-
या व्हिडीओमध्ये, तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नातील काही खास क्षण पाहायला मिळत आहे. यात तितीक्षाला अश्रू अनावर झाल्याच दिसत आहे.
-
तितीक्षाने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी नेसली होती. या साडीला गोल्डन किनार होती.
-
तर सिद्धार्थने बायकोला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. दोघं या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.
-
तितीक्षा आता बोडकेंची सून झाली आहे. लग्नाचा व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, “आम्हाला मिस्टर अँड मिसेस म्हणा.”
-
दरम्यान, तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या या लग्नाच्या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आशुतोष गोखले, गौरी कुलकर्णी, ऋतुजा बागवे, ऐश्वर्या नारकर, रेवती लेले, राधा सागर अशा अनेक कलाकारांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यावेळेपासूनच दोघांच्याही मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे म्हटले जाते.
-
तितीक्षाने आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
तर सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. (Photos: @theshutterkey/Instagram)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या