-
पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा शाही विवाहसोहळा २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला.
-
पूजाने तिच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीच्या लग्नात मराठमोळा थाट पाहायला मिळाला.
-
पूजा लग्नविधींसाठी मराठी परंपरेनुसार तयार झाली होती.
-
हिरवा चुडा, पिवळी साडी, भरजरी दागिने, वरमाला, मुंडावळ्या असा मराठमोळा साज शृंगार पूजाने लग्न लागताना केला होता.
-
लग्न पार पडल्यावर पूजा आणि सिद्धेशवर उपस्थित पाहुण्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली.
-
पूजाच्या लग्नसोहळ्यातील या सुंदर फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
थाटामाटात लग्न पार पडल्यावर सावंताची लेक आता चव्हाणांची सून झाली आहे.
-
दरम्यान, पूजा आणि सिद्धेशवर सध्या मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम आणि p16 studios )

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?