-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेल्या दत्तू मोरेच्या बायकोने काही दिवसांपूर्वी ठाण्यात पहिलं क्लिनिक उघडलं.
-
नवीन सुरुवात लिहित बायकोला शुभेच्छा देत दत्तूने ठाण्यातील क्लिनिक बाहेरील फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
-
पण दत्तू मोरेची बायको नेमकी कोणती डॉक्टर आहे? आणि दोघं कसे एकमेकांना भेटले? जाणून घ्या…
-
दत्तू मोरेच्या बायकोचं नाव स्वाती घुनागे असून ती डॉक्टर आहे.
-
स्वातीचं पुण्यात स्वतःचं क्लिनिक आहे. गेल्या वर्षी दत्तूने स्वातीशी लग्नगाठ बांधली.
-
दत्तू व स्वातीची भेट ५-६ वर्षांपूर्वी राहुल नावाच्या कॉमन मित्रामुळे झाली होती. पुण्यात दोघं भेटले होते. (फोटो सौजन्य – दत्तू मोरे इन्स्टाग्राम)
-
पुण्यातल्या भेटीनंतर दत्तू व स्वाती फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टन झाले. दोन वर्ष फक्त दोघं फेसबुक फ्रेंड होते. दोघं एकमेकांशी बोलत नव्हते.
-
स्वाती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघायची. त्यानिमित्ताने तिने एकेदिवशी दत्तूला मेसेज केला आणि मग दोघं एकमेकांशी खऱ्या अर्थाने बोलू लागले.
-
जेव्हा दोघं बोलू लागले तेव्हा स्वातीचं एमएस पूर्ण झालं होतं. त्यानंतर तिच्या कामात ती व्यग्र झाली आणि दत्तू त्याच्या कामात व्यग्र झाला. पण यादरम्यान दोघं एकमेकांच्या कधी जवळ आले, हे त्यांनाच कळालं नाही.
-
स्वातीला दत्तू आवडू लागला. तिने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती मेसेज डिलीट करायची. अखेर लग्नासाठी स्वातीनेचं दत्तूला विचारलं.
-
दत्तूने स्वातीला काही लगेच होकार दिला नाही. घरातील परिस्थिती व कामाचा व्याप पाहता त्याने सुरुवातीला खूप विचार केला. त्यानंतर दत्तूने स्वातीला होकार दिला आणि मग दोघांची लव्हस्टोरी अगदी फुलतं गेली.
-
अभिनेत्याने होकार दिल्यानंतर बोलणं वाढलं. दिवसभर काम असल्यामुळे सकाळी ४ ते ४.३० वाजेपर्यंत दोघं एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायचे. यादरम्यान नकळत दोघांमध्ये जवळीक वाढत गेली.
-
अखेर २३ मे २०२३ रोजी दत्तूने स्वातीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
-
दत्तूची बायको स्वाती ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. याशिवाय ती सामाजिक कार्यात सक्रिय असते.
-
सर्व फोटो सौजन्य – FRAMEFIRE STUDIO आणि दत्तू मोरे इन्स्टाग्राम

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्