-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध देओल कुटुंबाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. देओल कुटुंबात धर्मेंद्र यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे, परंतु या कुटुंबातील एक अभिनेता असा आहे ज्याची संपत्ती सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या संपत्तीच्या तुलनेत जास्त आहे.
-
जाणून घेऊया अशा एका सदस्याबद्दल म्हणजेच अभिनेता अभय देओल. अभय देओलने 2005 मध्ये इम्तियाज अलीच्या ‘सोचा ना था’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
अभयचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर पुन्हा त्याचा ‘आहिस्ता आहिस्ता’ हा दुसरा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
-
अभय आपल्या चुलत भाऊ सनी देओल आणि बॉबी देओलसारखा बॉलीवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून जास्त ओळखला जात नाही, परंतु अभयच्या जबरदस्त अभिनयाने मात्र चाहत्यांचे मन नक्कीच जिंकली.
-
या 48 वर्षीय अभिनेत्याचे बॉलीवूडमध्ये फ्लॉप करिअर असूनही त्याने कोटींची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभय देओलची एकूण संपत्ती 400 कोटी रुपये आहे.
-
बॉबी देओलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो 66 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. तर सनी देओलची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये आहे.
-
अभय देओल प्रतेक चित्रपटांसाठी ३ कोटी रुपयांचे मानधन घेतो. तसेच ब्रँड एंडोर्समेंटसाठी 25 लाख रुपये आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही तो चांगली कमाई करतो.
-
यासोबतच अभयची ‘फॉरबिडन फिल्म्स’ नावाची प्रोडक्शन कंपनीही आहे. ‘वन बाय टू’ (2014) आणि ‘व्हॉट आर द ऑड्स’ (2020) सारखे चित्रपट या प्रोडक्शनने प्रदर्शित केले आहे. याशिवाय तो ‘द फॅटी काऊ’ नावाच्या रेस्टॉरंटचे सह-संस्थापक देखील आहे.
-
मालमत्तेबद्दल बोलायचे तर अभय देओलचे मुंबईत सुमारे ₹27 कोटी रुपयांचा बंगला आहे. मुंबईशिवाय गोवा आणि पंजाबमध्येही त्याचे अनेक मालमत्ता आहे.
-
अभय देओलच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे २२ लाख रुपयांची मित्सुबिशी पजेरो एसएफएक्स, ३३.१३ लाख रुपयांची टिगुआन ऑलस्पेस एसयूव्ही आणि १.२४ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू एक्स६ आहे.
( सर्व फोटो: abhaydeol/instagram)

शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज