-
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक म्हणजे मृणाल दुसानिस. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री मृणाल दुसानिसने आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे जरी ती मनोरंनसृष्टीपासून दूर असली तरी चर्चेत असते. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वी मृणाल आपल्या कुटुंबासह मायदेशी पतरली. तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री भारतात आली आहे. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
गोदावरीच्या काठेवर पती व लेकीसह बसलेले फोटो शेअर करून मृणालने ही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
मृणाल भारतात परत आल्यामुळे ती पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत कमबॅक करण्याची आस प्रेक्षकांना लागली आहे. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अभिनेत्रीने पुन्हा मनोरंजनसृष्टीत कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, “प्रेक्षक मला आगामी कामाबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे मी आता चांगल्या संधीची वाट पाहत आहे. माझी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. याशिवाय मला नाटकातही काम करायला आवडेल. याआधी प्रायोगिक नाटकात काम केलं असून आता मला व्यावसायिक नाटकात काम करण्याची इच्छा आहे.” (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
पण भारतात आल्यानंतर सर्वप्रथम मृणालने काय केलं? माहितीये. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
चार वर्षांनी भारतात आल्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानिसने स्वामींच्या मठात जाऊ दर्शन घेतलं. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
स्वामींच्या दर्शनानंतर मृणालने आईच्या हातच्या जेवणावर ताव मारला. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, २०१६ साली मृणालने नीरज मोरे याच्याशी लग्नगाठ बांधली. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो अमेरिकेत राहतो. त्यामुळे लग्नानंतर मृणालने काही वर्षांसाठी मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेतला. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
पहिल्या ब्रेकनंतर तिने २०१८मध्ये ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून कमबॅक केलं. तिची ही मालिका चांगलीच गाजली. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
यानंतर २४ मार्च २०२२मध्ये मृणालला मुलगी झाली. तेव्हापासून ती मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. त्यामुळे मृणालच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम