-
पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला.
-
या दोघांच्या लग्नाला मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी खास उपस्थिती लावली होती.
-
लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यावर पूजाने तिच्या लग्नातील Unseen व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील वरमाला, कन्यादान, सातफेरे या विधींची झलक पाहायला मिळत आहेत.
-
लग्न लागल्यावर अभिनेत्रीच्या आईला अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रार्थना बेहेरे आणि सुखदा खांडकेकर यांनी पूजाच्या आईला धीर दिला.
-
पूजा आणि सिद्धेश यांनी लग्नात खास पारंपरिक लूक केला होता.
-
पूजाने हातातील हिरव्या चुड्यात evil eye डिझाइन असलेलं खास लॉकेट परिधान केलं होतं.
-
अभिनेत्रीच्या या लॉकेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
दरम्यान, पूजा सावंतने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ( फोटो सौजन्य : पूजा सावंत आणि p16studios )

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल