-
Zee Natya Gaurav 2024: मराठी नाट्यसृष्टीतील प्रतिष्ठित ‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
-
‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली.
-
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात.
-
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते अतुल परचुरे खूप काळानंतर ‘व्यक्ती आणि वल्ली’च्या रूपात रंगभूमीवर येणार आहेत.
-
अतुल यांच्याबरोबर अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते आनंद इंगळे आणि अभिनेते सुनील बर्वे असणार आहेत.
-
अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘शाहरुख मांजरसुभेकर’मधील प्रवेश साकारून ‘महेश मांजरेकरांना’ मानवंदना देणार आहे.
-
प्रेक्षकांना ‘जर तर ची गोष्ट’, ‘करून गेलो गाव’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहेत.
-
अनेक गोड सरप्राइज या नाट्य गौरवच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.
-
नटसम्राट येणार, हाऊसफुल्लचा बोर्ड लागणार प्रयोग पाहायला यावंच लागणार.
-
हा पुरस्कार सोहळा रविवारी ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहाता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल