-
अनेक लोकप्रिय वेबसिरीजचे तिसरे सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यातील काही वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या होत्या आणि प्रेक्षक त्यांच्या पुढील सीझनची आतुरतेने वाट पाहत आहे. जाऊन घेऊया काही वेब सिरीजबद्दल ज्यांचे तिसरे सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
‘पंचायत 3’ हे ओटीटी प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक आहे. या वेबसिरीजचे तिरसे सीझन २८ मे ला प्रदर्शित होणार आहे.
-
प्रेक्षकांच्या भेटीला ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचे दोन सीझन आले आहेत आणि दोन्हीही सीझन यशस्वी ठरले, आता चाहत्यांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. या वेबसिरीजचे तिसरे सीझनचे शूटिंग सुरू आहे आणि ते लवकरच प्रदर्शित होऊ शकते.
-
‘मिर्झापूर’ चा दूसरा सीझन मुन्ना आणि कलेन भैय्याच्या मृत्यूच्या सस्पेन्सवर संपला होता. पुढच्या भागात काय होणार याची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. त्या संदर्भात चाहत्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहे की, ‘मिर्झापूर 3’ ही वेब सीरिजचे जून किंवा जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित होऊ शकते.
-
‘दिल्ली क्राइम’चे पहिले सीझन हे दिल्लीच्या निर्भया केसवर आधारित होते तर ‘दिल्ली क्राइम-२’ ही कच्छा-बनियान गँगवर आधारित होते. दिल्ली क्राइम च्या तिसऱ्या भागातही खरी क्राईम स्टोरी असेल अशी शक्यता आहे, पण ती अजून समोर आलेली नाही. त्यामुळेच चाहते तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
‘असुर’ ही वेबसिरीज ओटीटीवर खूप यशस्वी ठरली होती आणि प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती, आता चाहते ‘असुर’च्या चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडियारीपोर्टस नुसार असुरचे तिसरे सीझन २०२४मध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
‘कोटा फॅक्टरी’चा पहिला आणि दुसरा सीझन खूप लोकप्रिय होता. आता या वेबसिरीज बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे आणि नुकतेच नेटफ्लिक्सने ही कोटा फॅक्टरीच्या तिसऱ्या सीझनचे पोस्टर रिलीज केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कोटा फॅक्टरी जून २०२४ पर्यंत प्रदर्शित होऊ शकते.

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!