-
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या फिटनेस रूटीनसाठी नेहमी चर्चेत असते.
-
अभिनेत्री आपला फिटनेस रूटीन नियमितपणे फॉलो करते. ती वर्कआउट, योगा व वेट ट्रेनिंगचा सरावही कधी चुकवत नाही.
-
अनुष्का फिटनेस रूटीनसह आपल्या रोजच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि फायबरचा समावेश करते. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकार शक्तीचे संतुलन राखले जाते.
-
अनुष्का दिवसभराच्या आहारातून फक्त पोषक पदार्थांचे सेवन करते. त्यामुळे तिला जास्त भूक लागत नाही.
-
अनुष्का आपल्या आहारात ग्लुटेनयुक्त पदार्थ आणि गोड पदार्थांचा समावेश टाळते.
-
अभिनेत्री आपल्या पहिल्या बाळाच्या गरोदरपणातही नियमितपणे वर्कआउट आणि योगा फॉलो करायची. त्यासंबंधीचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही पोस्ट केले होते.
-
आपल्या शरीराला अधिक लवचिक ठेवण्यासाठी वर्कआउट आणि योगासह अनुष्का दररोज सायकलिंग आणि स्विमिंगही करते.
-
वेळेत जेवण केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यासाठी अनुष्का आपले दिवसातील दुसऱ्या वेळचे जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजे संध्याकाळी ६ वाजता करते.
-
निरोगी आरोग्यासाठी आठ तासांची झोप अनिवार्य असते. म्हणून अभिनेत्री रात्री ९.३० ला झोपते.
-
आपल्या एका मुलाखतीत अनुष्काने हा खुलासा केला होता की, फोनच्या अधिक वापरामुळे होणाऱ्या अनेक समस्या टाळण्यासाठी ती फोनचा वापरही कमी करते.
-
(सर्व फोटो : अनुष्का शर्मा/ इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल