-
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार नेहमी चर्चेत असतो. सध्या हास्यजत्रामधील एक अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे.
-
काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ही अभिनेत्री मालदीव ट्रीपवर गेली होती. या ट्रीपमधील तिचे पतीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
-
मालदीव ट्रीपनंतर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ही अभिनेत्री पतीबरोबर नेपाळ ट्रीपला गेली आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ही अभिनेत्री कोण आहे? हे फोटोवरून लक्षात आलंच असेल. अभिनेत्री चेतना भट सध्या पतीसह नेपाळ ट्रीपवर आहे.
-
नेपाळचे फोटो चेतनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नेपाळ ट्रीपच्या पहिल्या दिवशी चेतना व तिच्या पतीने काठमांडूमध्ये प्रवास केला.
-
त्यानंतर ट्रीपच्या दुसऱ्या दिवशी नेपाळच्या मनोकामना मंदिराला दोघांनी भेट दिली.
-
अजूनही दोघांची नेपाळ सफर सुरू आहे.
-
दरम्यान, चेतना भटच्या पतीचं नाव मंदार चोळकर आहे; जे मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आहेत.
-
गेल्या कित्येक वर्षांपासून मंदार चोळकर मालिका, नाटक, चित्रपटासाठी गाणी लिहित आहेत.
-
अलीकडे प्रदर्शित झालेल्या मराठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील ‘वंदे मातरम्’ हे गाणं त्यांनी लिहिलं होतं.
-
‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘ओले आले’, ‘एकदा येऊन तर बघा’, ‘मुसाफिरा’, ‘लंडन मिसळ’, ‘लग्नकल्लोळ’, ‘ही अनोखी गाठ’, ‘फुलराणी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘दगडी चाळ’, ‘फ्रेंडस’, ‘दे धक्का २’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटातील गाणी मंदार चोळकर यांनीच लिहिली असून ती गाणी हिट देखील झाली आहेत. (सर्व फोटो सौजन्य – चेतना भट इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL