-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे.
-
दिवसेंदिवस या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळत आहेत. अशातच ‘पारू’ मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो समोर आला आहे; ज्यामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
-
प्रोमोच्या सुरुवातीला, सनई-चौघडे वाजताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पारू नाकात नथ, गळ्यात सुंदर हार, डोक्यावर मुंडावळ्या अशा नवरीच्या पेहरावात सजताना दिसत आहे.
-
मग मंडपात पारूची एन्ट्री आणि त्यानंतर आदित्यबरोबर लग्नगाठ, सप्तपदी हे सर्व विधी पाहायला मिळत आहेत. एवढंच नव्हे तर आदित्य पारूला मंगळसूत्र देखील घालताना दिसतो.
-
पण वरमाळा घातल्यानंतर खरं सत्य उघडकीस येत. पारू व आदित्यचं हे खरं लग्न नसून खोटं लग्न असतं; जे जाहिरातीसाठी केलं जातं. पण पारूला हे मान्य नसतं. “कायपण झालं तरी मी मंगळसूत्र काढणार नाही”, असं प्रोमोच्या शेवटी पारू म्हणताना दिसत आहे.
-
दरम्यान, ‘पारू’ हे पात्र साकारणाऱ्या शरयू सोनवणेने नववधूच्या रूपातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या सुंदर नऊवारी साडीमध्ये दिसत असून पारंपारिक दगिन्यांनी तिचा हा लूक पूर्ण करण्यात आला आहे.
-
पण प्रोमोमधून दाखवलेली गोष्ट सत्यात उतरणार का? पारू आणि आदित्यचं खरंच लग्न होणार का? लग्नसराईच्या विशेष भागात नेमकं काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
-
27 मे पासून झी वाहिनीवर ‘पारू’ मालिकेचे ‘लग्नसराई विशेष’ भाग पाहायला मिळणार आहेत. (फोटो : @nageshwarang)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या