-
मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार कोकणातले आहेत.
-
लागोपाठ सुट्ट्या किंवा शूटिंगमधून वेळ काढून हे कलाकार कोकणात जात असतात.
-
कोकणाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते.
-
अभिनेता कुशल बद्रिके आपल्या बायकोसह कोकणात पोहोचला आहे.
-
नारळाच्या बागा व समुद्रकिनाऱ्यांवर कुशलने बायकोसह खास फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी कुशल आणि त्याची पत्नी दोघंही वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाले.
-
अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंना “येवा कोकण आपलोच आसा” असं कॅप्शन दिलं आहे.
-
याशिवाय कुशलने दुसऱ्या एका फोटोला “कधी कधी पोहोचायचं कुठे? हे काही फार matter करत नाही, प्रवास कुणाबरोबर घडतो तेच महत्वाचं ठरतं” असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, नेटकऱ्यांनी कुशल बद्रिकेच्या या हटके फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कुशल बद्रिके इन्स्टाग्राम )

“बलात्कार करायला घरी माणसं पाठवू, अशा धमक्या देतात, माझ्या मागे…”, आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे फुके कुटुंबावर गंभीर आरोप