-
अनेक बॉलीवूड कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. राजकारण आणि बॉलीवूड हे एक जुनं नातं असल्यासारख आहे.
-
जाणून घेऊया लोकसभा २०२४च्या निवडणुकीतील काही बॉलीवूड कलाकारांबद्दल.
-
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून भाजपासाठी उमेदवारी केली आणि ७४,७५५ मतांनी जिंकून कॉंग्रेसच्या विक्रमआदित्य सिंगचा पराभाव केला.
-
रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारनारे ज्येष्ठ अभिनेता अरुण गोविल यांनी भाजपा द्वारे राजकारणात प्रवेश केला आहे. मेरठमध्ये १०,५८५ मतांनी ते विजयी ठरले.
-
बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनीने भाजपाद्वारे मथुरा मतदारसंघ तिसऱ्यांदा जिंकला आहे. त्यांनी एकूण २,९३,४०७ मतांनी कॉंग्रेस पक्षाच्या मुकेश धनगर यांचा पराभाव केला.
-
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा तृणमूल कॉंग्रेस पक्षासाठी उमेदवारी करत ५९,५६४ मतांनी विजयी झाले आहेत.
-
उत्तर पूर्व दिल्लीमधून भोजपुरी स्टार मनोज तिवारी तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तब्बल १,३७,०६६ मतांनी मनोज तिवारी यांनी कॉंग्रेसच्या कन्हैया कुमारचा पराभाव केला आहे.
-
अभिनेता रवी किशन भाजपाच्या गोरखपूरमधून निवडणूक लढवली आणि त्यांनी १,०३,५२६ मतांनी आपल्या विजयाची नोंद केली आहे.
-
केरळमध्ये भाजपाद्वारे निवडणूक लढून सुरेश गोपी हे ४,१२,३३८ मतांनी विजयी झाले आहेत. भाजपासाठी ही केरळमधील पहिली निवडणूक जागा ठरली आहे.
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Maharashtra News LIVE Updates : नाव बदलून १२ वेळा UPSC परिक्षा दिल्याच्या आरोपावर पूजा खेडकर म्हणाली, “मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या नावात…”