-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फीची माहितीही समोर येत आहे. १४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय विजय राज, राजपाल यादव, भुवन अरोरा आणि पलक लालवानी यांच्याही भूमिका आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या स्टारने किती मानधन घेतलं, ते जाणून घेऊया. (स्क्रीनशॉट)
-
कार्तिक आर्यन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंदू चॅम्पियनची भूमिका साकारण्यासाठी कार्तिक आर्यनने २५ कोटी रुपये इतकी मोठी फी घेतली आहे. (स्क्रीनशॉट) -
राजपाल यादव
या चित्रपटातील भूमिकेसाठी राजपाल यादवला २ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. (फोटो स्रोत: राजपाल यादव/फेसबुक) -
विजय राज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटासाठी विजय राज यांना ७० लाख रुपये दिले आहेत. (फोटो – स्क्रीनशॉट) -
यशपाल शर्मा
यशपाल शर्मा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे आणि त्याला या चित्रपटातील भूमिकेसाठी ३० लाख रुपये मिळाले आहेत. (फोटो स्रोत: @iyashpalsharma/instagram) -
भुवन अरोरा
शाहिद कपूरच्या फर्जी या वेब सीरिजमध्ये दिसलेला भुवन अरोरा यानेही या चित्रपटात भूमिका साकारली आहे, ज्यासाठी त्याला ३० लाख रुपयांपर्यंत फी मिळाली आहे. (फोटो स्रोत: @bhuvanarora27/instagram) -
पलक लालवानी
या चित्रपटासाठी पलक लालवाणीने २० ते ३० लाख रुपये फी घेतली आहे. (फोटो स्रोत: @pallakl/instagram)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल