-
‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेमुळे अभिनेत्री पूर्वा फडके घराघरांत लोकप्रिय झाली.
-
मालिकेत सध्या शिवा आणि आशूची लगीनघाई पाहायला मिळत आहे. परंतु, शिवाचं खऱ्या आयुष्यात देखील लग्न झालेलं आहे.
-
पूर्वा फडकेच्या लग्नाला जवळपास ५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
पूर्वाचा नवरा देखील मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे.
-
पूर्वाच्या नवऱ्याचं नाव अमोघ फडके असं आहे.
-
अमोघने आतापर्यंत अनेक नाटकांसाठी प्रकाशयोजनाकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
-
यंदाच्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात त्याला ‘जन्मवारी’ या व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे.
-
प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकासाठी सुद्धा त्याने प्रकाशयोजनाकाराची धुरा सांभाळली आहे.
-
पूर्वा आणि अमोघ इन्स्टाग्रामवर नेहमीच फोटो शेअर करत असतात. सध्या अभिनेत्री तिच्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पूर्वा फडके आणि अमोघ फडके इन्स्टाग्राम )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल