-
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाचे पहिले फोटो शेअर केले आहेत. या जोडप्याने मॅचिंग ऑफ-व्हाइट पोशाख घातले होते. सोनाक्षीने सुंदर साडी निवडली, तर झहीर कुर्त्यामध्ये होता. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक प्रियजन तिथे हजर होते. सोनाक्षीने तिच्या नोंदणीकृत लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना वडील बाजूला उभे पहायला मिळाले. (PTI Photo)
-
रविवारी २३ जून रोजी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला, मुंबईतील सेलिब्रिटीच्या आवडत्या रेस्टॉरंट बॅस्टियन मध्ये रात्री एक पार्टी आयोजित केली होती.यामध्ये बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. या जोडप्याने लग्नासाठी हस्तकाम केलेले पोशाख निवडले होते. नंतर सोनाक्षी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पती झहीरसोबत फिरताना बनारसी लाल साडीमध्ये तसेच भांगेत कुंकू ल्यायलेली दिसली. झहीरने ऑफ-व्हाइट पोशाख घातला होता. लग्नाच्या रिसेप्शनला सलमान खान, रेखा, तब्बू, अदिती राव हैदरी, सायरा बानो, शर्मीन सेगल, काजोल, रवीन टंडन, विद्या बालन, अरबाज खान आणि अनिल कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान त्यांच्या लग्नाच्या अगोदर, या जोडप्याने २० जून रोजी मित्र आणि कुटुंबासाठी एक इनडोअर पार्टी आणि २१ जून रोजी मेहंदी समारंभाचे आयोजन केले होते. पार्टीत सोनाक्षीचे आई-वडिल शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा देखील उपस्थित होते. (PTI Photo)
-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी काही महिन्यांपासून तिच्या लग्नाची तयारी करत होती. तिने नेहमीच लग्नात साधेपणा ठेवण्याची भूमिका ठेवली आणि लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी ड्रेस कोड पारंपारिक वेशभूषेचा ठेवण्याच्या सूचना केल्या. या वर्षाच्या सुरुवातीला सोनाक्षीने बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये ब्लॅक लेहेंगा घालून रॅम्पवर चालताना तिच्या लग्नात टी काय परिधान करेल यावर व्यक्त झाली होती. ती म्हणाली होती, “जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मला क्लासिक लाल लेहेंगा घालायला आवडेल.” (Photo: Varinder Chawla)
-
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या पार्टीतील आणि लग्नातील उपस्थितीने ते या लग्नाबद्दल खूश नसल्याच्या आणि लग्न समारंभालाही उपस्थित नसतील या अफवा आता खोट्या ठरल्यात. (Photo: Varinder Chawla)
-
शनिवारी, सोनाक्षी सिन्हाच्या पालकांनी त्यांच्या घरी पूजा आयोजित केली होती, जिथे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षीची आई एकत्र विधीमध्ये सहभागी झाले. पूजेपूर्वी सोनाक्षी आणि झहीरने त्यांच्या जवळच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसाठी एक छोटी पार्टी आणि मेहंदी समारंभही आयोजित केला होता. (Photo: Instagram)
-
ज्येष्ठ अभिनेत्री रेखासह बॉलीवूडचे अनेक ए-लिस्ट स्टार्स रिसेप्शन पार्टीला उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
सोनाक्षीची हीरामंडीतील सहकलाकार संजीदा शेख, शर्मीन सेगल मेहता आणि तिचा नवरा जय मेहता आणि अदिती राव हैदरी, सिद्धार्थसह उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
अनिल कपूर या प्रसंगी उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
दरम्यान, तब्बू आणि काजोल सुंदर पारंपारिक वेशभूषेत दिसल्या.(Photo: Varinder Chawla)
-
आदित्य रॉय कपूर लग्नाच्या रिसेप्शनमध्ये काळ्या रंगाच्या सूटमध्ये पोहोचला. (Photo: Varinder Chawla)
-
रॅपर हनी सिंगही यावेळी उपस्थित होता. मुंबईत येताना घेतलेल्या पापाराझी व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की, आज मी अल्कोहोल सेवन न करता नृत्य करेन. (Photo: Varinder Chawla)
-
रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीने विवाहसोहळ्यात तिच्या आईने पूनम सिन्हा यांनी हस्तकाम केलेली साडी नेसली होती. साध्या पट्टेदार ब्लाउजसह असलेली ही सहावारी साडी होती. “आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी (२३/०६/२०१७)आम्ही एकमेकांच्या डोळ्यात शुद्ध निर्मळ प्रेम पाहिले आणि ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रेमाने आम्हाला सर्व आव्हाने आणि संकटांमध्ये मार्ग दाखवला … या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत, … जिथे आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवतांच्या आशीर्वादाने… आता आम्ही पती आणि पत्नी आहोत. येथे प्रेम, आशा आणि एकमेकांसोबत सर्व सुंदर गोष्टी आहेत,आत्तापासून नेहमीसाठी!”,” अशा शब्दात सोनाक्षी लग्नानंतर तिच्या इन्स्टाग्रामवर व्यक्त झाली आहे. (PTI Photo) हेही पहा- PHOTOS : बघावं ते नवलचं! ‘या’ पक्ष्याच्या एका पंखाची किंमत आहे तब्बल २३ लाख रुपये!

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..