बॉलीवूड कलाकार अनेकदा आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतात.
(फोटो : दीपिका पदुकोण /इन्स्टाग्राम) काही बॉलीवूड कलाकारांनी नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी देखील ठरले.
(फोटो : दिशा पटानी/इन्स्टाग्राम) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आगामी सिनेमांद्वारे काही बॉलीवूड कलाकार पदार्पण करण्याची चर्चा आहे. जाणून घेऊया या बद्दल.
(फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम) अभिनेत्री जान्हवी कपूर ‘देवरा’ या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या तेलुगु चित्रपटात सैफ अली खान आणि श्रुती मराठे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
(फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम) ‘ओजी’ चित्रपटातील अभिनेता इमरान हाश्मीचा फर्स्ट लुक सध्या चर्चेत आहेत. या आगामी चित्रपटात अभिनेता ओमी भाऊ नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून इमरान तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
(फोटो : इमरान हाश्मी/इन्स्टाग्राम) ‘कांगुवा’ या चित्रपटाद्वारे अभिनेता बॉबी देओलचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
(फोटो : बॉबी देओल/इन्स्टाग्राम) शनाया कपूर अभिनेते मोहनलाल सोबत आगामी चित्रपट ‘वृषभा’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
(फोटो : शनाया कपूर/इन्स्टाग्राम)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग बहुप्रतिक्षित ‘हिंदुस्तान-२’ मध्ये अजय देवगण आणि कमल हासन यांच्या सोबत दिसणार आहे.
(फोटो : रकुल प्रीत सिंग/इन्स्टाग्राम)