-
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला ही आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने केवळ हिंदीतच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.
‘हिरमंडी’ या मालिकेसाठी अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या काही दिवसांबद्दल सांगितले. तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला बिकिनी घालण्याचा सल्ला दिला गेला होता. अभिनेत्रीने तसे करण्यास नकार दिला आणि त्यावर उत्तर देखील दिले. जाणून घेऊया बॉलिवूडमधील हा किस्सा. -
मनीषा कोईराला अभिनयात करिअर करण्यासाठी नेपाळ वरुण मुंबईत आली होती. मुलाखतीत आपल्या प्रवसाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ”चित्रपटसृष्टीत येणे खूप कठीण होते. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बिकिनी घालण्यास सांगितले होते”.
-
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, चित्रपटच्या ऑडिशनपूर्वी तिला अनेकदा तिचे फोटो आणण्यास सांगितले होते. म्हणून ती तिच्या आईसोबत फोटोशूट करण्यासाठी एक प्रसिद्ध फोटोग्राफरकडे गेली होती.
-
जेव्हा ती त्यांच्याकडे गेली तेव्हा त्या फोटोग्राफरने सांगितले की ती भविष्यातील सुपरस्टार आहे. त्यानंतर फोटोग्राफरने टू-पीस बिकिनी आणून अभिनेत्रीला दिली आणि ती घालण्यास सांगितले. यावर ती म्हणाली की समुद्रकिनारी किंवा पोहायला गेल्यावर मी असे कपडे नक्की घालेन.
-
इतकंच नाही तर मनीषाने फोटोग्राफरला पुढे सांगितलं की, ”जर मला अशा पद्धतीने चित्रपटांमध्ये काम करण्याचा मार्ग निवडावा लागत असेल तर मी हे मुळीच करणार नाही”
-
याशिवाय अभिनेत्रीने असेही म्हटले होते की, जर तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर पूर्ण कपड्यांमध्ये करा. फोटोग्राफरशी झालेला शेवटचा संवाद आठवून मनिषा कोईराला म्हणाली की, ”जो मिट्टी पिघलने से शरमाती हो, उसको मूर्ती कैसे बनाये?” असा प्रश्न फोटोग्राफरने तिला केला.
-
या संवादादरम्यान मनीषा कोईराला पुढे म्हणाल्या की, काही लोकांची ९० च्या दशकात अशीच मानसिकता होती. जेव्हा पुढे मी प्रसिद्ध अभिनेत्री झाले तेव्हा त्याच फोटोग्राफरने माझे फोटो क्लिक केले होते. त्यावेळी अभिनेत्रीसोबतचा जुना संवाद आठवत तो म्हणाला की ”मला माहीतच होतं की तू मोठी स्टार बनणार आहेस.”
-
मात्र, मनीषा कोईरालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यातील त्याच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.
-
(सर्व फोटो- मनीषा कोईराला/इन्स्टाग्राम)

LSG vs RCB: ऋषभ पंतने पंचांजवळ जाऊन ‘ते’ अपील नाकारत जिंकली मनं! जितेशने चालू सामन्यातच मारली मिठी; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?