-
रोनित रॉय हा टीव्ही सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. जो एकेकाळी सहा रुपये घेऊन मुंबईत आला होता मात्र, आज रोनित रॉय कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे. अभिनेत्याने अलीकडेच मुंबईत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनित रॉयने मुंबईतील पॉश एरिया वर्सोवा येथे समुद्र किनाऱ्याजवळ एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या घराची किंमत सुमारे १८.३४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
-
हा फ्लॅट ४, २५९ स्क्वेअर फूटचा असून तो मॅक्रोटेक डेव्हलपर्सचा आहे. या घराला चार पार्किंग स्लॉट देखील आहेत. या इमारतीत इन्फिनिटी पूल, जिम अशा अनेक सुविधाही आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फ्लॅट रोनित रॉयने १० जून रोजी खरेदी केला होता आणि या घराची मुद्रांक शुल्क सुमारे १.१३ कोटी रुपये आहे.
-
रोनित रॉय मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त ६ रुपये आणि २० पैसे होते. त्यांचा पहिला पगार फक्त ६०० रुपये होता आणि आज ते जवळपास ९९ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
-
अभिनयाव्यतिरिक्त रोनित रॉय हे एक यशस्वी व्यापारी देखील आहे अभिनेत्याची स्वतःची सीक्युर्टी एजन्सी आहे.
-
त्याची सुरक्षा एजन्सी सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या स्टार्सना सेवा पुरवते. याशिवाय त्यांची कंपनी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि त्यांचा मुलगा रुचिर मोदी यांनाही अंगरक्षक पुरवते.

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा