-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा कार्यक्रम केवळ अंबानी कुटुंबासाठी खास नव्हता तर बॉलीवूड आणि बिझनेस जगतातील अनेक स्टार्सयामध्ये सहभागी झाले होते. हा सोहळ्यामध्ये सर्व स्टार्सनी आपल्या स्टाइल आणि फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुकेश अंबानी सोनेरी रंगाच्या शेरवानीमध्ये दिसले. तर आकाश लाल रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. पाहूया या कार्यक्रमात स्टार्स कोणत्या लूकमध्ये पोहोचले.
-
नीता अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या हळदी समारंभात हैदराबादी सूट परिधान केला होता. हा सूट सुरेख भरतकाम, अँटिक जरी वर्क, एव्हरग्रीन जरदोजी एम्ब्रॉयडरी यांनी सजवला होता. हा सूट प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे.
-
अनंतची बहीण ईशा अंबानीनेही तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने समारंभासाठी ‘तोराणी’ लेबलवरून बहु-रंगीत असलेला लेहेंगा निवडला. समारंभात हा लेहेंगा इंडो-वेस्टर्न टच देत होता. तिने हा लेहेंगा हॅल्टर-नेक टॉपसह पेअर केले.
-
राधिका मर्चंटची बहीण अंजली मर्चंट देखील हळदी समारंभात पारंपारिक ड्रेसमध्ये दिसली. समारंभासाठी अंजलीने सिल्कचा लेहेंगा परिधान केला होता. या थ्री-पीस सेटमध्ये फ्लेर्ड बॉल स्टाइल स्कर्ट होता, ज्यावर गोल्डन फ्लोरल प्रिंट होते. यासोबत तिने जरी वर्क असलेला जांभळ्या रंगाचा हाफ स्लीव्हज ब्लाउज आणि सोनेरी दुपट्टा कॅरी केला होता.
-
अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात अभिनेता सलमान खानने पिवळा कुर्ता सेटचे परिधान केले. या सिम्पल पारंपरिक लूकचे चाहत्यांनी कौतुक केले.
-
जान्हवी कपूर या हळदी सोहळ्यात पिवळ्या साडीचे परिधान केले होते. ही साडी चिकनकारी सिक्वेन्स वर्क असलेली होती. या साडीसोबत अभिनेत्रीने फुल स्लीव्ह ब्लाउज पेअर केले.
-
मानुषी छिल्लर अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात केशरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
या समारंभात सारा अली खानने गुजराती लूक फॉलो केला. या कार्यक्रमासाठी तिने बहुरंगी लेहेंगा निवडला होता. या लेहेंग्यावर केलेली एम्ब्रॉयडरी खूपच आकर्षक होती. हा लेहेंगा मयूर गिरोत्रा यांनी डिझाईन केला आहे.
-
या समारंभात सहभागी होण्यासाठी अनन्या पांडेने पेस्टल कोरल गुलाबी रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता.
-
या हळदी समारंभात रणवीर सिंगनेही पिवळा कुर्ताचे परिधान केला होता. या पिवळ्या कुर्त्यात तो स्टायलिश दिसत होता.
-
अर्जुन कपूरनेही अनंत-राधिकाच्या हळदी सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान अर्जुन कपूरनेही मरून रंगाचा कुर्ता परिधान केला.
-
या समारंभात ओरीने जॅकेटसह कुर्ता परिधान केला. या हिरव्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या जॅकेटमध्ये तो खूपच छान दिसत होता.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”