-
कतरिना कैफ सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. यावर तिचा पती विकी कौशलने नुकतीच प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की “असे काही घडले तर ते चाहत्यांमध्ये शेअर करायला मला आनंद होईल, पण सध्या या अफवांमध्ये काही तथ्य नाही”. कतरिना कैफ आज १६ जुलै रोजी तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे, तर चला जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी (पीटीआय)
-
बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफने आज इंडस्ट्रीत जे काही स्थान मिळवले आहे, ते तिच्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. (पीटीआय)
-
दरम्यान एक आगळी वेगळी कामगिरी करणारी कतरिना कैफ ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. कोणती आहे ती कामगिरी जाणून घेऊया
-
२००९ साली अमेरिकेत कतरिना कैफच्या नावाने एक विक्रम नोंदवण्यात आला. ज्याची इतिहासात नोंद झाली आहे.
-
ग्लोबल आयकॉन असलेल्या कतरिनाकडे बॉलीवूडची बार्बी डॉल म्हणून पाहिलेच जाते, परंतु कतरिनाच्या सुंदरतेवर इन्स्पायर होऊनही एक बार्बी डॉल बनवण्यात आली आहे.
-
कतरिना आधी मर्लिन मुनरो, शकिरा, ऑड्री हेपबर्न, एलिजाबेथ टेलर आणि हेडली क्लम यांच्या सुंदरतेवर बार्बी डॉल्स बनवण्यात आल्या आहेत.
-
२००९ साली लॅक्मे फॅशन वीकमध्ये निष्का लुल्ला या डिझायनरसाठी कतरिनाने ‘बार्बी ऑल डॉल्ड अप’ या शो मध्ये रॅम्प वॉक केला होता. हा शो बार्बीच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
-
अमेरिकन मल्टीनॅशनल टॉय मेकिंग कंपनी, Mattel Toys ने कतरिना कैफच्या उपस्थितीत ‘कतरीना बार्बी डॉल’ हे मॉडेल बाजारात आणणार असल्याचे घोषित केले होते.
-
(All Photos Source : @katrinakaif/Insta)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”