-
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीना कुमारी यांना ट्रॅजेडी क्वीन म्हणूनही ओळखले जाते. मीना कुमारी या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. वयाच्या अवघ्या ४ वर्षापासूनच त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. मीना कुमारी यांच्या प्रेमकहाणी बद्दल बोलायचे झाले तर त्यांची प्रेम कहाणी एका रुग्णालयात सुरू झाली.
-
अवघ्या ३३ वर्षांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये मीना कुमारी यांनी ९०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांचे नाव मेहजबीन बानो होते. अभिनयासोबत त्या एक उत्कृष्ट कवयित्री देखील होत्या.
-
मीना कुमारी यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले. असे म्हटले जाते लग्नानंतर मीना कुमारी यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले.
-
कमल अमरोही १९३८ मध्ये आलेल्या जेलर चित्रपटासाठी बालकलाकाराच्या शोधात होते, त्या दरम्यान त्यांची मीना कुमारी यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. बऱ्याच वर्षांनंतर, जेव्हा तमाशा चित्रपटाची शूटिंग सुरू होती तेव्हा अशोक कुमारने कमल अमरोही यांची मीना कुमारी यांच्याशी त्यांच्या सेटवर ओळख करून दिली.
-
यावेळी त्यांनी मीना कुमारीला ‘अनारकली’ चित्रपटात मुख्य भूमिका ऑफर केली. मात्र याच महिन्यात २१ मे रोजी महाबळेश्वरहून मुंबईला परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
-
डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत कमाल अमरोही रोज त्यांना भेटायला यायचे. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि १४ फेब्रुवारी १९५१ रोजी कमाल अमरोही यांनी मीना कुमारीसोबत लग्न केले. या लग्नाबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती. अगदी मीना कुमारीच्या घरच्यांनाही नाही.
-
कमाल अमरोही विवाहित होते आणि त्यांना तीन मुले होती. काही महिन्यांनंतर जेव्हा लग्नाची बातमी पसरली तेव्हा मीना कुमारीचे वडील अली बक्श यांनी त्यांना घटस्फोट घेईल सांगितलं मात्र, मीना कुमारी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.
-
यानंतर अमरोही यांनी मीना कुमारीला काही अटींसह अभिनय सुरू ठेवण्याची परवानगी दिली. ‘साहिब बीबी और गुलाम’चे दिग्दर्शक अबरार अल्वी यांच्या म्हणण्यानुसार, अमरोही यांचा गुप्तहेर बकर अली नेहमी मीना कुमारी यांच्या मेकअप रूममध्ये उपस्थित असायचा.
-
एकदा अमरोही यांच्या गुप्तहेर बकर अली आणि मीना कुमारी यांच्या मध्ये एक हिंसक वाद झाला होता.
-
यानंतर कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना तातडीने घरी परतण्यास सांगितले. या अपघातानंतर मीना कुमारी आपल्या बहीण मधूच्या घरी गेल्या आणि त्यानंतर त्या पुन्हा अमरोही यांच्या घरी गेल्या नाहीत. लग्नाच्या ११ वर्षांनी१९६४ साली मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांना घटस्फोट दिला.
-
यानंतर मीना कुमारी एकाकी पडल्या आणि घटस्फोटानंतर त्यांना दारूचे इतके व्यसन जडले की शेवटी त्यांना आपला जीव गमवावा लागला.

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं?