-
मृणाल ठाकूर ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिच्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयामुळे ती नेहमी चर्चेत असते. मृणालने बॉलिवूडशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मृणालने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
-
एकेकाळी टीव्ही मालिकेत साइड रोल करणारी मृणाल ठाकूर आज कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. जाणून घेऊया अभिनेत्रीच्या एकूण संपत्ती.
-
२०१२ मध्ये ‘मुझे कुछ कहती…ये खामोशियां’ या मालिकेतून मृणाल आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली पण तिला फारशी ओळख मिळाली नाही. यानंतर ती झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत दिसली आणि त्यानंतर तिचा यशाचा प्रवास सुरू झाला.
-
टीव्हीच्या दुनियेत प्रसिद्ध झाल्यानंतर मृणाल चित्रपटांकडे गेली. बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अभिनेत्री खूप संघर्ष केले आणि आज तिला तिच्या संघर्षाचे फळ मिळत आहे. मृणालने स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला ती निराशेने रडायची तेव्हा तिची आई-वडील तिला प्रोत्साहन द्यायचे आणि म्हणायचे की, एक दिवस तू जगासमोर उदाहरण होशील, मृणाल.’
-
मृणाल ठाकूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘सुपर ३०’ मधील मृणालची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर ती जॉन अब्राहमसोबत ‘बाटला हाऊस’ आणि ‘तूफान’ चित्रपटातही दिसली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर मृणालने बॉलीवूडसह अनेक हीट दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत.
-
मृणाल ठाकूरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये कमावते. मृणालकडे महागड्या कारही आहेत. मृणालकडे ३० लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि ४५ लाख रुपयांची होंडा एकॉर्ड आहे.
-
मृणाल ठाकूरने अलीकडेच २.१७ कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ एस-क्लास लक्झरी सेडान कार खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे ३३ कोटी रुपये आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा