-
‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगने नुकतेच आपले वजन कमी केले आहे. मोना सिंगने अवघ्या सहा महिन्यात १५ किलो वजन कमी केले आहे.
-
एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की अनेकदा तिला इंडस्ट्रीमध्ये बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.
-
मोना सिंगने वजन कमी करण्याच्या काही टिप्स देखील शेअर केल्या आहेत. अभिनेत्री नियमित व्यायाम करून आणि पोषक आहारचे सेवन करते.
-
जिममध्ये व्यायाम करण्याऐवजी मोना योगा करण्यास प्राधान्य देते यामध्ये अनेक योगासने, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश आहे.
-
अभिनेत्रीने सांगितले की योगा हे वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. योगामुळे शरीरातील लवचिकता आणि ताकद वाढते आणि तणाव देखील कमी होतो.
-
मोनाने पुढे सांगितले की आपल्या दैनंदिन आहाराची मर्यादा मर्यादित केल्याने आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते आणि विविध रोगांचा धोकाही कमी होतो.
-
आहारात प्रथिने आणि फायबरला प्राधान्य देऊन तिने तिच्या आहारात सुधारणा केली. हे आवश्यक पोषक घटक केवळ शरीराला ताकद देत नाहीत तर वजन नियंत्रणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिनांचे सेवन केल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते ज्यामुळे भूक ही कमी लागते.
-
अभिनेत्री हे ही सांगितले की प्रथिने आणि फायबर हे दोन्ही शरीरात स्नायू तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मासे, अंडी, बीन्स आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या प्रथिने स्त्रोतांचा समावेश करू शकता.
-
(सर्व फोटो: मोना सिंग/इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर