-
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
-
त्याचवेळी, या चित्रपटाने भारतात २५० कोटी रुपयांचा आकडा अवघ्या सहा दिवसांत पार केला.
-
या यशादरम्यान, चित्रपटामध्ये डायनच्या व्यक्तिरेखेची खूप चर्चा होत आहे. ती कोण आहे याबद्दल सस्पेंस आहे, चला तर मग स्त्री २मध्ये डायनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल खास माहिती जाणून घेऊया. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)
-
‘स्त्री’मध्ये डायनची भूमिका फ्लोरा सैनीने साकारली होती. यात तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. यामुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. पण, आता ‘स्त्री’च्या सिक्वेलमध्ये ही भूमिका वेगळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)
-
‘स्त्री 2’ मध्ये डायनची भूमिका केलेली अभिनेत्री भूमी राजगोर आहे. ती प्रामुख्याने गुजराती सिनेमांसाठी ओळखली जाते. गुजराती सिनेमातून तिने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती मुळची अहमदाबादची आहे. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)
-
अभिनेत्री असण्यासोबतच भूमी राजगोर एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिचे डान्स व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असते. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)
-
अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी भूमी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. ती बऱ्याच दिवसांपासून मुंबईत राहते.
-
भूमीने झूमशी संवाद साधताना ‘स्त्री 2’ मध्ये तिला चिट्टीची भूमिका कशी मिळाली हे सांगितले. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने ऑडिशन दिले होते. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)
-
दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यामुळे तिला ही भूमिका मिळाल्याचे भूमीने सांगितले. जेव्हा ते मॅडॉक प्रॉडक्शन हाऊसमध्ये भेटले तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला जोरात ओरडण्यास सांगितले आणि भूमीने सर्व शक्तीने ओरडून ही भूमिका जिंकली. अशा प्रकारे तिने फ्लोरा सैनी यांची जागा घेतली. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)
-
‘स्त्री 2’पूर्वी भूमी राजगोर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने कियाराच्या बहिणीची भूमिका साकारली होती. (फोटो- भूमी राजगोर/इन्स्टा)

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही