-
मृणाल दुसानिस अमेरिकेहून भारतात परतल्यावर तब्बल ४ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
-
मृणालचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
स्टार प्रवाहच्या मालिकेत मृणाल दुसानिस प्रमुख भूमिका साकारणार आहे.
-
या मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
-
स्टार प्रवाच्या गणेशोत्सवासाठी मृणालने खास मराठमोळा लूक केला होता.
-
पोपटी रंगाची साडी, नाकात नथ, सुंदर दागिने या मराठमोळ्या लूकमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत होती.
-
मृणालला छोट्या पडद्यावरची आदर्श सून म्हणून ओळखलं जातं.
-
‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
-
आता अमेरिकेहून कायमस्वरुपी भारतात परतल्यावर मृणाल नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेचं नाव लवकरच जाहीर करण्यात येईल असं अभिनेत्रीने माध्यमांसमोर सांगितलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस व @miss_canon_21 इन्स्टाग्राम )

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक