-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानची अभिनय कारकीर्द काही खास राहिली नाही. सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. तिची कारकीर्द काही खास नसली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून ही अभिनेत्री शिवाशिष मिश्राला डेट केल्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान अशातच आता त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर येत आहे. (Photo- Zareen Khan/Insta)
-
होय तुम्ही बरोबर वाचले आहे. अभिनेत्री झरीन खानबद्दल चर्चा आहे की तिचा प्रियकर आणि माजी बिग बॉस स्पर्धक शिवाशिष मिश्रासोबतचे तिचे दीर्घकालीन नाते तुटले आहे. दोघेही वेगळे झाले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने ETimes च्या रिपोर्टमध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. (Photo- Zareen Khan/Insta)
-
झरीन खान आणि शिवाशिषचे काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले आहे. दरम्यान दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही किंवा ब्रेकअपबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले नाही. (Photo- Zareen Khan/Insta)
-
झरीन खान आणि शिवाशिष यांच्या नात्याबद्दल बोलले जात आहे की दोघेही २०२१ पासून एकमेकांना डेट करत आहेत. जवळपास तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी आता हे नाते संपुष्टात आणले आहे. (Photo- Zareen Khan/Insta)
-
झरीन खानने गेल्या महिन्यात भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला आणि लग्नाबाबत तिचे मत व्यक्त केले. तिला लग्न का करायचे नाही हे तिने सांगितले होते. तिला लग्न करायचे नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. लग्न प्रक्रियेला ती ओझे मानत नाही पण आजच्या काळाचा दाखला देत तिने सांगितले की आज कालचे लग्न फक्त तीन महिने टिकते. (Photo- Zareen Khan/Insta)
-
झरीन खानने एकदा फिल्मीज्ञानशी बोलताना सांगितले होते की, तिचा लग्नावर विश्वास नाही. यावेळी तिने आपला बॉयफ्रेंड असल्याची कबुली दिली होती, मात्र तिने कोणाचेही नाव घेतले नव्हते. (Photo- Zareen Khan/Insta)
-
या मुलाखतीत अभिनेत्रीने तिचा लग्नावर विश्वास नसल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर दोन व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी सरकार किंवा कोणाच्या मान्यतेची गरज नाही. असे मत मांडले होते. याशिवाय मला कोणालाही यातून दुखवायचे नाहीय हे माझे मत आहे. ज्यांचे पटते त्यांचे विवाह टिकतात असेही यावेळी तिने सांगितले होते. (Photo- Zareen Khan/Insta)
-
झरीनचे असे म्हणणे होते की जर कोणी एकमेकांबरोबर राहण्याचा आनंद घेत असतील तर त्यांना एकत्र राहण्यासाठी कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. (Photo- Zareen Khan/Insta)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”