-
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 साठी भारताकडून अधिकृत प्रवेश मिळाला आहे. या चित्रपटाने मोठ्या आणि लोकप्रिय चित्रपटांना मागे टाकत ऑस्करच्या शर्यतीत स्थान निर्माण केले आहे. (Stills From Movie)
-
भारतीय चित्रपट महासंघाच्या समितीने 29 भारतीय चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीत ‘लपता लेडीज’ची निवड केली आहे. (Stills From Movie)
-
चित्रपटाचे बजेट फक्त 4 ते 5 कोटी रुपये असून सुद्धा ‘लापता लेडीज’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. (Stills From Movie)
-
2 मे 2024 पर्यंत, चित्रपटाने 20.24 कोटींच्या निव्वळ नफ्यासह भारतात 24.1 कोटी कमावले होते. (Stills From Movie)
-
चित्रपटाने जगभरात ₹25.26 कोटी कमावले आहेत, जे त्याच्या बजेटच्या तुलनेत एक उत्कृष्ट आकडा आहे. (Stills From Movie)
-
या चित्रपटाने 662.33 कोटींची कमाई करणाऱ्या ‘ॲनिमल’ला, 74.94 कोटींची कमाई करणाऱ्या चंदू चँपियनला, 294.25 कोटींची कमाई करणाऱ्या कल्की 2898 एडी’ला, 59.58 कोटींची कमाई करणाऱ्या ‘श्रीकांत’ला तसेच कलम ३७०’ सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकत ऑस्करच्या शर्यतीत आपले स्थान निर्माण केले आहे. (Stills From Movie)
-
चित्रपटाची कथा दोन नवविवाहित नववधूंच्या अवतीभोवती फिरते ज्यांची त्यांच्या पतीच्या घरी जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल होते. (Stills From Movie)
-
या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल आणि रवी किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. (Stills From Movie)
-
‘लापता लेडीज’ने आपल्या रंजक कथेने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच, पण बॉक्स ऑफिसवरही यश मिळवले. या चित्रपटाचा ऑस्करमध्ये प्रवेश हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. (Stills From Movie)
हेही वाचा- Oscar 2025: ऑस्कर २०२५ साठी दक्षिणेतील एकूण १३ चित्रपट पाठवण्यात आले, प्रभासच्या ‘या…

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल