-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच चर्चेत असते.
-
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली.
-
दरम्यान प्रियदर्शनीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शनीच्या हातात एक ट्रॉफीही दिसत आहे.
-
विनोदोत्तम करंडक २०२४ मधील ‘विनोदवीर पुरस्कार’ प्रियदर्शनीला मिळाला आहे.
-
गेल्या १७ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत यंदा प्रियदर्शनी इंदलकरला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
-
या कार्यक्रमातील फोटो प्रियदर्शनीने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे मोठं काम करता आलं आणि म्हणूनच हा पुरस्कारही मिळवता आला असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली आहे.
-
प्रियदर्शनीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या निर्मात्यांचे आभार मानले आहेत. “अभिनय करिअर सुरु असताना माझ्या आयुष्यात सचिन मोटे, सचिन गोस्वामी आले आणि आज मला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे! मी तुमची कायमची ऋणी आहे. अशा सन्मानांसाठी, आणि अजुन अनेक गोष्टींसाठी!” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
प्रियदर्शनीवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
(सर्व फोटो प्रियदर्शनी इंदलकर इन्स्टाग्राम पेजवरून साभार)

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल