-
शाहरुख खान हे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. किंग खानने अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करत लोकांची मने जिंकली आहेत.
-
शाहरुख खानने बऱ्याच रोमँटिक चित्रपटांत काम करून प्रेक्षकांना प्रेमाची भाषा विविध प्रकारांत समजावली आहे.
-
त्याच्या या सुपरहिट चित्रपटांच्या खजिन्यातून या पाच रोमँटिक चित्रपटांबद्दल जाणून घेऊ.
-
देवदास : प्रेमात वेडे होऊन शेवटपर्यंत त्या व्यक्तीची वाट पाहणे यातून प्रेमाचा खरा अर्थ समजावणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९०.६३ कोटी रुपये कमावले होते.
-
कुछ कुछ होता है : ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक अशा या चित्रपटाने ९१.०५ कोटी कमावले. त्यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी व काजोल यांच्यातला अतूट प्रेम अनुभवायला मिळते.
-
वीर-जारा : प्रेम, वेगळेपणा, धैर्य व बलिदानाची कथा दर्शविणाऱ्या या चित्रपटाने ९७ कोटी कमावले. या चित्रपटाचे बजेट २२ कोटी होते.
-
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : शाहरुख खानचा सर्वांत जास्त गाजलेला रोमँटिक चित्रपट. या चित्रपटाने ९८.५ कोटींचा धमाका बॉक्स ऑफिसवर केला होता.
-
दिल तो पागल है : माधुरी दीक्षित व करिष्मा कपूर या प्रसिद्ध कलाकारांसह गाजवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५८.६१ कोटी कमावले.
-
(सर्व फोटो सौजन्य : जनसत्ता, लोकसत्ता आणि शाहरुख खान/ इंस्टाग्राम )

एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस