-
मराठीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
-
गेल्या सात वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत.
-
महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा चाहता वर्ग आहे. त्यामुळे सातत्याने या कार्यक्रमाचे विदेश दौरे होतं असतात.
-
लंडन दौऱ्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नवं पर्व सुरू झालं आहे.
-
या नव्या पर्वात परीक्षणाची जबाबदारी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओकवर आहे.
-
पण, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सई ताम्हणकराचा आवडता व्यक्ती तुम्हाला माहितीये का?
-
हास्यजत्रेच्या सेटवरील सईची लाडकी व्यक्ती प्रसाद ओक आहे. ती प्रसादला ‘पश्याजी’ या नावाने हाक मारते. याविषयी तिने ‘सोनी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
-
सई ताम्हणकर म्हणाली, “ही माझी साथी, सवंगडी पश्याजी. आमच्या दोघांमध्ये जर कोणी माइक लावला तर काय होईल याची गॅरंटी आम्ही नाही घेऊ शकतं आणि मला असं वाटतंय शेजारी बसण्यासाठी यापेक्षा चांगली व्यक्ती नसावी. आमची जोडी परफेक्ट आहे. इथे बसून आमच्या दोघांचीही साथ मला तितकीच आवडते.”
-
पुढे सई म्हणाली की, कधी कधी प्रसादच्या जागी सिद्धार्थ जाधव येतो, सोनाली कुलकर्णी येते, निर्मिती सावंत येतात पण मी बेधडकपणे बोलते मला पश्याजीची आठवण येते. आम्ही याच्याआधी मित्र होतो. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने आमचं नातं आणखी दृढ झालं. मला प्रसाद सारखा मित्र भेटला, यासाठी मी आनंदी आहे. ( सर्व फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम / सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्