-
Red One
‘रेड वन’ हा हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन, ख्रिस इव्हान्स आणि जे.के. अभिनीत अमेरिकन ख्रिसमस ॲक्शन फिल्म आहे. या चित्रपटात सिमन्ससारखे महान कलाकार आहेत. ही कथा ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सांताक्लॉजला वाचवण्याच्या रोमांचक मोहिमेवर आधारित आहे. -
Mechanic Rocky
‘मेकॅनिक रॉकी’ हा तेलुगू भाषेतील ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात विश्वक सेन मुख्य भूमिकेत आहे. कथा एका मेकॅनिकभोवती फिरते जो आपल्या वडिलांचे गॅरेज वाचवण्यासाठी स्थानिक गुंडांचा सामना करतो. -
Kanguva
‘कंगुवा’ हा एक भव्यदिव्य तमिळ ॲक्शन चित्रपट आहे. यामध्ये सुर्या दुहेरी भूमिका साकारत आहे आणि यामधून बॉबी देओलने तमिळमध्ये पदार्पण केले आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळ आणि वर्तमान दरम्यानच्या रोमांचक प्रवासात घेऊन जातो. -
Agni
‘अग्नी’ हा हिंदी भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात प्रतीक गांधी, दिव्येंदू आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट आगीच्या रहस्यमय घटना आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा एक फायरमन आणि एक पोलीस अधिकारी यांची कथा आहे. -
Matka
‘मटका’ हा तेलुगू भाषेतील ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातची कथा वासू या गरीब मुलाभोवती फिरते जो मटका जुगाराच्या (सट्टा) जगात आपला ठसा उमटवतो आणि सरकारशी संघर्ष करतो. -
Girls Will Be Girls
‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ हा इंडो-फ्रेंच ड्रामा चित्रपट आहे. यात मीर नावाच्या किशोरवयीन मुलीची कहाणी आहे, जी तिचे पहिले प्रेम आणि तिच्या आईसोबतच्या गुंतागुंतीच्या नात्यवर भाष्य करते. -
Pushpa: The Rise
‘पुष्पा: द राइज’ हा ब्लॉकबस्टर तेलुगू ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये अल्लू अर्जुनने लाल चंदन तस्करीत मोठे नाव बनणाऱ्या पुष्पा राजची भूमिका साकारली आहे. -
Vettaiyan
‘वेट्टयन’ हा तमिळ ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे. यात रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे, जो एका खून प्रकरणात चुकून एका निरपराध व्यक्तीला मारतो. -
Stree 2
‘स्त्री २: सरकटे का आतंक’ हा हिंदी भाषेतील कॉमेडी-हॉरर चित्रपट आहे. हा ‘स्त्री’चा सिक्वल आहे आणि यावेळी ही कथा ‘सरकटे’ या शिरच्छेद झालेल्या आत्म्याच्या दहशतीवर आधारित आहे. -
Vaathi
‘वाथी’ हा एक पीरियड ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे, ज्यात धनुष मुख्य भूमिकेत आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष करणाऱ्या शिक्षकाची ही कथा आहे.
हेही पाहा- अभिनेता राम कपूरचं बदललेलं रूप पाहून चाहते थक्क; ५१ व्या वर्षी घटवलं तब्बल ४२ किलो वजन, पाहा फोटो

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”