-
बॉलीवूडमध्ये दरवर्षी नवीन चेहरे आपले नशीब आजमावतात, परंतु स्टार किड्सचे पदार्पण नेहमीच चर्चेत असते. 2025 मध्येही अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहेत. यामध्ये काही दिग्गज स्टार्सची मुलं आणि त्यांच्या नात्यातील मुलांचा समावेश आहे. या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्टार किड्सबद्दल जाणून घेऊया. (चित्रपटातून)
-
राशा थडानी
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी 2025 मध्ये ‘आझाद’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशाचा हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. (फोटो स्त्रोत: @rashathadani/instagram) -
अमन देवगन
अजय देवगनच्या बहिणीचा मुलगा अमन देवगनही ‘आझाद’ चित्रपटातून डेब्यू करणार आहे. राशा व अमनची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. (फोटो स्त्रोत: @aamandevgan/instagram) -
शनाया कपूर
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर 2025 मध्ये दोन मोठ्या चित्रपटांतून पदार्पण करत आहे. पहिला चित्रपट ‘वृषभा’ हा पॅन इंडिया चित्रपट आहे. तर दुसरा चित्रपट ‘आँखों की गुस्ताखियां’ आहे. (फोटो स्रोत: @shanayakapoor02/instagram) -
इब्राहिम अली खान
सैफ अली खानचा मुलगा आणि सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान ‘सरजमीन’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. (फोटो स्रोत: @iakpataudi/instagram) -
सिमर भाटिया
अक्षय कुमारची पुतणी सिमर भाटिया देखील 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. ती ‘इक्किस’मध्ये दिसणार आहे. (फोटो स्रोत: @simarbhatia18/instagram) -
अहान पांडे
अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे देखील यावर्षी मोहित सुरीच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. अहानचे पदार्पण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
(फोटो स्रोत: @ahaanpandayy/instagram)

Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी