-
ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला महाकुंभात किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले. मात्र आता तिची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
किन्नर आखाड्याने अवघ्या सात दिवसात ममता कुलकर्णीकडून महामंडलेश्वराचा मुकुट हिसकावून घेतला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णीने अलीकडेच संन्यास घेतल्यानंतर किन्नर आखाड्यात सामील झाल्याची माहिती दिली होती. महाकुंभात तिला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मात्र यानंतर बराच गदारोळ झाला होता. किन्नर आखाड्यातच ममता कुलकर्णीबाबत मतभेद झाले होते. शेवटी किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी त्यांची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अजय कुमार दास यांनी ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना किन्नर आखाड्यातून काढून टाकले. त्यांनी आरोप केला की ममताला चुकीच्या पद्धतीने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णी ही ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच ममता कुलकर्णी तिच्या लूकसाठी देखील चर्चेत होती. सुरुवातीच्या काळात ती खूप सुंदर दिसत होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णीने जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा तिने तिच्या लूक्सने खळबळ उडवून दिली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
९० च्या दशकात ममता कुलकर्णीचे अनेक फोटोशूटही खूप चर्चेत होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेत्रीने अनेक फोटोशूट केले आहेत ज्यासाठी ती त्या काळात चर्चेत होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णी अनेकदा वादात सापडली आहे. तिचे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले आहे. मात्र, ती नेहमीच ते नाकारत आली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णीचे नाव ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीसोबतही जोडले गेले आहे. २०१६ मध्ये ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांचे लग्न झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मात्र, अभिनेत्रीने तेही फेटाळून लावले आणि विकी गोस्वामी एक चांगला माणूस आहे पण दोघांचेही लग्न झालेले नाही, असे सांगितले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
१९९३ मध्ये ममता कुलकर्णी खूप चर्चेत होती. यादरम्यान तिने एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केले होेते. ज्याला जनतेने कडाडून विरोध केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
वाद वाढल्यानंतर ममता कुलकर्णीला १५ हजार रुपयांचा दंडही भरावा लागला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णीने १९९१ साली ‘नन्नाबर्गल’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर १९९२ मध्ये ‘मेरा दिल तेरे लिए’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णीने ‘वक्त हमारा’, ‘क्रांतीवीर’, ‘करण अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘आंदोलन’, ‘बाजी’, ‘चायना गेट’ आणि ‘चुप्पा रुस्तम: अ म्युझिकल थ्रिलर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ममता कुलकर्णी २००२ मध्ये ‘कभी तुम कभी हम’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर २००३ मध्ये आलेला तिचा शेवटचा चित्रपट ‘बोंगसोधर’ हा बंगाली भाषेत होता. यानंतर तिनेचित्रपट जगतातून निवृत्ती घेतली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा- Photos : सौंदर्याची खाणच होती ममता कुलकर्णी, ९० च्या दशकातील तिचे ‘हे’ फोटो पाहिलेत का?

शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज