-
अभिनेत्री माधुरी दीक्षितला दोन मुलं आहेत. तिच्या मोठ्या मुलाचं नाव अरिन आहे तर, धाकट्या मुलाचं नाव रायन असं आहे.
-
माधुरीचा मोठा मुलगा अरिन नुकताच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून पदवीधर झाला आहे.
-
माधुरीचे पती डॉ. नेनेंनी लाडक्या लेकाचं कौतुक करत खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
-
अरिन नेने याने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’मधून कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी मिळवली आहे.
-
माधुरी लेकाबद्दल म्हणते, “मला अरिनचा खूप जास्त अभिमान वाटतोय. सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आज कॉलेजमध्ये खूप सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला होता. माझ्या अरिनला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”
-
माधुरी आणि तिचे पती डॉ. नेने हे दोघंही अरिनच्या कॉलेजमध्ये त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
-
तर, डॉ. नेने मुलाचं कौतुक करत म्हणतात, “अरिन नेने… ‘विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’मधून पदवीधर झाला आहे. पदवीधर झालेल्या सगळ्या मुलांना खूप शुभेच्छा आणि कॉलेजमधील प्राध्यापकांचे खूप खूप आभार…”
-
अरिनने मिळवलेलं शैक्षणिक यश आणि माधुरीचा वाढदिवस या दोन्ही गोष्टी यंदा नेने कुटुंबीयांनी एकत्र साजऱ्या केल्या. असंही डॉ. नेनेंनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.
-
दरम्यान, सध्या माधुरीचा मुलगा अरिन नेनेवर बॉलीवूडमधून देखील कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : डॉ. श्रीराम नेने इन्स्टाग्राम )

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्