-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने यंदा कान्समध्ये पहिल्यांदा हजेरी लावली.
-
तिचा कान्समधील हा डेब्यू संस्मरणीय ठरला आहे.
-
त्याचे कारण म्हणजे तिच्या ‘होमबाऊंड’ सिनेमाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अन सर्टेन रिगार्ड विभागात वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.
-
तसेच तिने केलेला हा अप्रतिम लूकही चर्चेत आला आहे.
-
अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर एन्ट्री मारताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
याच लूकने आता सोशल मीडियावरही धुमाकूळ उडवून दिला आहे.
-
जान्हवीने नुकतेच हे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
या लूकमध्ये जान्हवीने हलका गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
यावर तिने मोत्याचा आकर्षक नेकलेस परिघान केला आहे.
-
हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी बनवला आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना जान्हवीने “#Homebound at the 78th #CannesFilmFestival” असे कॅप्शन दिले आहे.
-
दरम्यान, कान्स फेस्टिव्हल यंदा १३ मे ते २४ मे २०२५ दरम्यान फ्रान्समधील कान्स शहरात पार पडत आहे. हेही पाहा- ‘RRR’ ते जनता गॅरेज; ज्युनियर एनटीआरचे १० सर्वोत्तम चित्रपट, जर तुम्हीही त्याचे चाहते असाल तर जरूर पाहा…

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..