-
अलका कुबल २७ वर्षांनंतर रंगभूमीवर परतल्याने चाहत्यांसह अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेता अभिषेक देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत आहे. याआधी अभिषेक देशमुख ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत होता.
-
आता अलका कुबल यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वजन कमी कसे केले, यावर वक्तव्य केले.
-
अलका कुबल यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, जेव्हा त्या चित्रपटात काम करायच्या तेव्हा त्या काय डाएट करायच्या?
-
यावर अभिनेत्री म्हणाल्या, “तेव्हा मी तशीच होते. मी अपघातानंतर बदलले. पण, आताच मी योगायोगाने ९-१० किलो वजन कमी केलं आणि मला हे नाटक मिळालं.”
-
वजन कसं कमी केलं? यावर बोलताना अलका कुबल म्हणाल्या, मी भरपूर चालते. मी डाएटमध्ये भाकरी खाते. भात जवळजवळ खात नाही. जर मासे खाणार असेल तर भात खाते, असं ठरलेलं डाएट असतं. फळं खाते.”
-
“मी वजन ठरवून कमी केलं, कारण कामंही भरपूर येत आहेत. पाच-सहा सिनेमे करतेय. एक हिंदी वेब सीरिज बहुधा करेन. तर कामं भरपूर आल्यानं मला वाटायला लागलं की आपण फिट असलं पाहिजे.”
-
सौंदर्याबाबत बोलताना अलका कुबल म्हणाल्या, “आपलं मन आनंदी असेल, आपण जर मनाने समाधानी असू, तर ते चेहऱ्यावर येतं.”
-
“वय कधीही लपत नाही. तरुण दिसण्याचा प्रश्न नाही, फिट असण्याचा प्रश्न आहे.”
-
“आता बारीक झाले म्हणून मी १६ वर्षांची दिसणार नाही. आहे ते वय हे दिसणार आहे. पण, त्या वयातही फिट राहणं मला फार महत्त्वाचं वाटतं.”(फोटो सौजन्य: अलका कुबल इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”