-
‘फ्रेशर्स’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या शुभंकर तावडेने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.
-
शुभंकर व त्याची बहीण अंकिता या दोघांनी हे आलिशान घर आई-वडिलांसाठी घेतलं आहे.
-
शुभंकर हा मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे.
-
“आमचं तावडे निवास… एका नव्या अध्यायाची सुरुवात!” असं कॅप्शन देत अभिनेत्याच्या बहिणीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शुभंकरची बहीण पोस्ट शेअर करत सांगते, “आम्ही आमच्या आई-बाबांसाठी एक छानसं घर खरेदी केलं आहे.”
-
“आई-बाबांनी एवढी वर्षे आमच्यासाठी खूप काही केलं. त्यामुळे या घराच्या रुपात आमच्याकडून आई-बाबांना ही छोटीशी भेट. प्रेम आणि आशीर्वादांनी परिपूर्ण असलेलं आमचं हक्काचं हे तावडे निवास…” असं शुभंकरच्या बहिणीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
आई-बाबांना हे सुंदर घर भेट म्हणून दिल्याबद्दल सध्या मराठी कलाविश्वातून शुभंकरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
अनेकांनी शुभंकर व अंकिताचा प्रचंड अभिमान वाटतोय असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
-
दरम्यान, मालिकांसह शुभंकरने ‘कागर’, ‘कन्नी’, ‘वेड’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शुभंकर तावडे व अंकिता सुनील तावडे इन्स्टाग्राम )

Israel-Iran conflict : ‘तर पाकिस्तान इस्त्रायलवर अणुबॉम्ब टाकेल’, इराणच्या खळबळजनक दाव्यावर पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…