-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळे प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
सुमीत साकारत असलेल्या हृषिकेश रणदिवे या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमीतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर १४ डिसेंबर २०२२ मध्ये त्याने लग्न केलं.
-
सुमीतच्या पत्नीचं नाव मोनिका महाजन पुसावळे असं आहे.
-
बायकोबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सुमीतची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. आज मोनिकाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सुमीत लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोनिका! लव्ह ऑफ माय लाइफ, तुझ्यामुळे माझं आयुष्य पूर्ण झालं…तू माझ्या आयुष्यात आलीस हे माझं भाग्यच आहे.”
-
“तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत आणि देवाचे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठिशी राहोत. आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी तू डिझर्व्ह करतेस” अशी पोस्ट शेअर करत सुमीतने पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने #Sumona ( सुमीत-मोनिका ) हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
-
सुमीत शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी मोनिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भक्ती देसाई, पूर्वा शिंदे, प्रतिक्षा मुणगेकर, ऋतुजा कुलकर्णी या कलाकारांनी सुमीतच्या पोस्टवर मोनिकासाठी खास कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सुमीत सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत हृषिकेश रणदिवे या मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
-
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सुमीतबरोबर अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत झळकत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सुमीत व मोनिका पुसावळे इन्स्टाग्राम )

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल