-
सिंगर अमाल मलिक हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतेच्या त्याने त्याच्या कौटुंबिक वादाबद्दल भाष्य केले आहे. सदर पोस्टमुळे वाद उठल्यानंतर त्याने पोस्ट डिलीटही केली. आता अमाल मलिकने त्याच्या लव्ह लाइफबद्दल धक्कादायक दावा केला आहे. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमाल मलिक म्हणाला की, पाच वर्ष प्रेयसीला डेट केल्यानंतर तिनं धर्माच्या कारणावरून ब्रेकअप केलं. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
अमाल मलिक म्हणाला की, तो आणि त्याची गर्लफ्रेंड २०१४ ते २०१९ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र प्रेयसीच्या घरातून या नात्याला परवानगी नव्हती. सिने जगतातील व्यक्ती आणि मुस्लीम व्यक्तीशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमाल मलिकनं हा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, मी पहिल्यांदाच या विषयावर जाहीर बोलत आहे. तो काळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
ब्रेकअपची आठवण सांगताना अमाल मलिक म्हणाला की, त्यादिवशी मी लाइव्ह परफॉर्मन्ससाठी तयार होत होतो. तेवढ्यात तिचा फोन आला आणि ती म्हणाली, माझ्या पालकांनी माझे लग्न ठरविले आहे. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
गर्लफ्रेंडनं असंही सांगितलं की, तू जर मला घ्यायला आलास तर मी तुझ्याबरोबर पळून जाण्यास तयार आहे. पण त्यावेळी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील शाहरुख खान माझ्या अंगात आला. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
तुझे आई-वडील माझा धर्म स्वीकारत नसतील, माझ्या कामाला पसंती देत नसतील, तर तुला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट… (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
आपल्या धर्माबद्दलही अमाल मलिक म्हणाला, माझे वडील मुस्लीम आहेत, तर आई सारस्वत ब्राह्मण आहे. पण मी माऊंट मेरीलाही जातो. आपण देवावर विश्वास ठेवतो. पण देवाला कधी घाबरत नाही. आपल्यात कोणत्याही धर्माचा कट्टर विचार नाही. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
माझ्या गर्लफ्रेंडच्या पालकांना माझ्या धर्मापेक्षा सिनेजगताची अधिक अडचण होती. ते म्हणाले, तू इस्लाम धर्मीय आहे. मी त्यांना म्हणालो, इस्लामचा ‘इ’ देखील माझ्यात नाही. मी धर्मावर नाही तर कर्मावर विश्वास ठेवतो. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
अमिल मलिकचा जन्म १६ जून १९९० रोजी झाला होता. त्याचे आई वडीलही गायक होते. वयाच्या ८ व्या वर्षापासून अमालने संगीताचे धडे गिरवले. बॉलिवूडची अनेक गाणी अमाल मलिकने गायली आहेत. (Photo – Instagram / @amaal_mallik)
-
अमिल मलिक सधन कुटुंबात येतो. त्याच्याकडे ३७.५ कोटींची संपत्ती असल्याचे वृत्त माध्यमांनी मार्च २०२५ मध्ये दिले होते. युट्यूब, म्युझिक व्हिडीओ, मॉडेलिंग, जाहिरात, स्कीन क्लिनीक, जिम आणि सोशल मीडियाद्वारे अमाल मलिक कोट्यवधी रुपये कमवतो. (Photo – Instagram / @amaal_mallik)

ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”