-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात लोकप्रिय झाला.
-
नुकतीच पृथ्वीकने मुंबईच्या राणीबागेत (Rani Baug, Mumbai) भटकंती केली आहे.
-
राणीबागेतील काही फोटो शेअर करत पृथ्वीक म्हणाला… “जाईच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी मला राणीबाग म्हणजेच ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला” भेट देता आली.
-
“आम्ही संपूर्ण कुटूंब या सफारीसाठी गेलो होतो. खरं तर… मी खूप लहान असताना राणीच्या बागेत आलो होतो पण, आज इतक्या वर्षांनी परत आल्यानंतर हे ठिकाण मला खूप बदललेलं जाणवतंय…”
-
“मुंबईच्या धावपळीच्या जीवनात, गोंगाटात शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर राणीबाग हे खरचं उत्तम ठिकाण आहे.”
-
“हे ठिकाण फक्त लहान मुलांसाठीचं नाही आहे. तर तुम्हाला निसर्ग, प्राणी, झाडं यांच्याविषयीची योग्य माहिती हवी असल्यास ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल..”
-
“इथे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी, पक्षी, तसेच पेंग्विन्स सुद्धा पाहायला मिळतात.”
-
“या सफारीच्या वेळी मी सुद्धा थोडा लहान झालो छान बागडलो, जाई आणि आम्ही सर्वानी मजा केली. तो दिवस एन्जॉय केला.. एक दिवस छान मोकळा वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत ह्या ठिकाणी नक्की भेट द्या मजा येईल…
-
(सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप/इन्स्टाग्राम)

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…