-
सलमान खान गेली अनेक वर्षे वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.
-
भाईजानच्या घरी नेहमीच अनेक सेलिब्रिटींचा गोतावळा असतो. त्याच्या घरी अनेक कलाकार भेट देत असतात.
-
हजारो कोटींचा मालक असलेला सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न त्याच्या बहुसंख्य चाहत्यांना पडला आहे.
-
२००९ मध्ये फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ या कार्यक्रमात सलमानला त्याच्या घराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आई-बाबांच्या जवळ राहता यावं यासाठी त्याने घर बदललं नाही असं अभिनेत्याने सांगितलं होतं.
-
“बॉलीवूडमध्ये तू सुपरस्टार आहेस. करोडोंच्या घरात संपत्ती आहे, तरी आजही तू १ बीएचके घरात का राहतोस? तुझं घर तुझ्या आईच्या घराखाली आहे हे यामागचं कारण आहे का?” असा प्रश्न फराह खानने सलमानला विचारला होता.
-
यावर सलमान खान म्हणाला, “हो खरंतर आमच्या घरी तीन रुम्स आणि हॉल होता. परंतु, आता या घरात एकच बेडरुम हॉल कसा राहिला मला माहिती नाही.”
-
सलमान खानचे घर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आहे. तर, त्याचे आई-बाबा पहिल्या माळ्यावर राहतात.
-
फराह पुढे विचारते, “मला वाटतं कदाचित आई-बाबांच्या जवळ राहून तुझ्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.”
-
यावर सलमान सांगतो, हो कारण, जेव्हा मी त्यांच्या घरी म्हणजे वरच्या मजल्यावर राहायला जातो, तेव्हा मी आई-वडिलांच्या शेजारी झोपतो.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेस)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख