-
मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार गणपतीच्या सणाला त्यांच्या गावी कोकणात जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही छाया कदम, निखिल बने, अंशुमन विचारे यांसारखे अनेक कलाकार कोकणात गेले होते. याचबरोबर अभिनेत्री तितीक्षा तावडेने सुद्धा गौरी-गणपतीचा सण तिच्या माहेरी साजरा केला.
-
तितीक्षाचं माहेर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असरोंडी येथे आहे. आपल्या आई-बाबांसह अभिनेत्री अनेकदा माहेरी कोकणात जाते.
-
गणेशोत्सवानिमित्त तितीक्षा आणि तिची मोठी बहीण अभिनेत्री खुशबू तावडे या दोघीही कोकणात गेल्या आहेत.
-
तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खुशबूच्या मुलांची झलकही पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्रीने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत तिच्या संपूर्ण असरोंडी गावची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
तितीक्षाचं माहेर खूपच सुंदर आहे. याठिकाणी त्यांचं सुंदर असं कौलारू घर आहे. मोठ्या प्रशस्त अंगणात छानसा झोपाळा आहे. अभिनेत्रीच्या घराजवळील निसर्गरम्य परिसर सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
-
तितीक्षा व खुशबू या दोघींनी माहेरी गौरी-गणपतीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला. पारंपरिक पद्धतीने तावडे कुटुंबीयांच्या घरी गौराईचं आगमन झालं. सगळ्या कुटुंबीयांनी मिळून गौराई अन् गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्याचं अभिनेत्रीच्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.
-
तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौरी विसर्जनाची परंपरा, कोकणातील संस्कृती याची झलक पाहायला मिळत आहे.
-
तितीक्षा व खुशबू यांच्या असरोंडी गावचे सुंदर फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. याशिवाय कोकणातील गणेशोत्सवाची झलक शेअर केल्याने चाहत्यांनी अभिनेत्रीचे आभारही मानले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे व खुशबू तावडे इन्स्टाग्राम )

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी