-
गँग्स ऑफ वासेपूर
अनुराग कश्यपचा ‘गँग्स ऑफ वासेपूर १’ हा चित्रपट यादीत सर्वात टॉपवर आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. boxofficeindia.com नुसार, या चित्रपटाने भारतात २८.२ कोटींची कमाई केली. चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी सरासरीपेक्षा कमी होती. (Photo: Still from film) -
मनमर्जियां
अनुराग कश्यपचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २५ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
गँग्स ऑफ वासेपूर २
‘गँग्स ऑफ वासेपूर २’ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २२.९६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
बॉम्बे वेल्वेट
या यादीत ‘बॉम्बे वेल्वेट’ चौथ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २२ कोटी ८० लाख २५ हजार रुपये कमावले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
डेव्ह डी
या यादीत डेव्ह डी हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात १५ कोटी ३० लाख २५ हजार रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी हिट ठरला. (Photo: Still from film) -
मुक्काबाज
मुक्काबाज हा चित्रपट यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात १० कोटी ६३ लाख २५ हजार रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
रमन राघव २.०
रमन राघव २.० हा चित्रपट यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ६.८० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
अग्ली
यादीत आठव्या क्रमांकावर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अग्ली’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ६ कोटी २३ लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
ब्लॅक फ्रायडे
या यादीत नवव्या क्रमांकावर २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॅक फ्रायडे आहे. या चित्रपटाने भारतात ४ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट फ्लॉप ठरला. (Photo: Still from film) -
गुलाल
या यादीत दहाव्या क्रमांकावर २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गुलाल’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ४ कोटी ३० लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”